Tuesday 15 May 2012

साधं सोपं आयुष्य
साधं सोपं जगायचं
हसावंसं वाटलं तर हसायचं
रडावंसं वाटलं तर रडायचं

जसं बोलतो तसं नेहमी
वागायला थोडंच हवं
प्रत्येक वागण्याचं कारण
सांगायला थोडंच हवं
ज्यांना सांगायचं त्यांना सांगायचं
ज्यांना टांगायचं त्यांना टांगायचं!

मनात जे जे येतं ते ते
करून बघितलं पाहिजे आपण
जसं जगावं वाटतं तसंच
जगून बघितलं पाहिजे आपण
करावंसं वाटेल ते करायचं
जगावंसं वाटेल तसं जगायचं...असेलही चंद्र मोठा
त्याचं कौतुक कशाला एवढं
जगात दुसरं चांदणं नाही
आपल्या हसण्या एवढं!
आपणच आपलं चांदणं बनून
घरभर शिंपत रहायचं

साधं सोपं आयुष्य
साधं सोपं जगायचं
हसावंसं वाटलं तर हसायचं
रडावंसं वाटलं तर रडायचं....


पहिलं प्रेम - चौथीमधलं
पुन्हा एकदा करायचंय
पुन्हा एकदा माझ्यावर
तिला हसताना पाहायचंय
काही गोष्टी चुकून सुटतात
आणि काही सुटून चुकतात
चुकलेलं, सुटलेलं बरंच काही
पुन्हा एकदा जमवायचंय
काही करून आयुष्यात
एकदा पुन्हा लहान व्ह्यायचंय

तिची हुशारी अभ्यासातली
माझी होती खोड्यांमधली
तिला मिळती शाबासक्या
मला नेहमी उठा-बश्या
पहिला नंबर दोघांचाही
तिचा वरून, माझा खालून
- एकदा तरी बदलायचंय
काही करून आयुष्यात
एकदा पुन्हा लहान व्ह्यायचंय

मागल्या बाकावरची माझी
जागा होती ठरलेली
तिरका कोन साधून गुपचुप
नजर तिला भिडलेली
सर मला नेमके तेव्हाच
प्रश्न काही करायचे
- आणि नंतर झोडायचे
एकदा तरी मला त्यांना
उत्तर चोख द्यायचंय
काही करून आयुष्यात
एकदा पुन्हा लहान व्ह्यायचंय


अजून पाचवीतला पहिला दिवस
मनात तसाच आहे
नवे शहर, नवी शाळा
सारं नवीन आहे
एकदाही तिच्याशी
बोललो सुद्धा नाही
आज सुद्धा त्याची
बोच मनात आहे

गाव माझे सोडण्याआधी
एकदा तिला भेटायचंय
काही करून आयुष्यात
पुन्हा लहान व्ह्यायचंय

काही करून आयुष्यात
पुन्हा लहान व्ह्यायचंय.
 
 
फक्त तुझाच एक वेडा प्रियकर ................................

मी एकटाच बारा होता
तू अचानक आयुष्यात आलीस
काय घडत हे कळण्याआधीच
तू प्रेमाचा रंग भरून गेलीस

कोणातही न मिसळणारा मी
आता, तुझ्याशी तासनतास गप्पा मारतो
विषय काही नवा नसतो आपल्यात
पण, तुझ्याशी बोलायला वेळ कमी पडतो

छोटीशी गोष्ट अर्ध्यावर राहिलीतर
ती, मला उदयावर ढकलता येत नाही
तुझा फोन जर आला नाही तर
मला रात्रीला नीट झोप लागत नाही

भांडणही करून पाहिलं तुझ्याशी
पण, तुझ्याशिवाय मन करमत नाही
काय अवस्था असते त्या दिवशी माझी
ज्या दिवशी तू माझ्याशी बोलत नाही

मी माझ्यापेक्षाही जास्त तुझी काळजी करतो
तुझ्या चेहरयावर हसू पाहण्यासाठी धडपडतो
काय नशा तुझी प्रेमाची माझ्यावर
मी, आजही जीवापाड प्रेम तुझ्यावर करतो

दे वचन मला तू आज
गोड ओठांच्या चुंबनाची घेत साक्ष
कधी देणार नाही माझ्या प्रेमाला अंतर
आयुष्यभर फक्त माझीच राहशील तू निरंतर

Sunday 8 April 2012

एक मुलगी मला आवडली


एक मुलगी मला आवडली



कॉलेजमध्ये असताना
एक मुलगी मला आवडली
तुम्हाला सांगतो ती इतकी आवडली ना
कि चोहिकडे मला फक्त तिच दिसू लागली..
वेळ वाया जात आहे किती
तिला मनातले सांगेनच ह्याची नाही शाश्वती
पण मनात होती भीती म्हणाली असती
मित्रा, हे तर होतय फारच अति
कॉलेज संपले
नोकरी सुरू झाली
तसा थोडा तिचा विसर पडला
अन अहो भाग्य!! आज ति चक्क समोर आली
आली होती माझ्या कंपनीमध्ये
मुलाखत देण्यास
आणि मि होतो तिथे
तिची मुलाखत घेण्यास
मुलाखत सोडली
आणि गेलो कॉफी प्यायला
विचारले तिला आहेस एकटी
कि आहे कोणी तुझा दादला..?
तिचा बोलका चेहरा सर्व काही सांगून गेला
जणू चातकाचा कौल पावसाने स्विकारला
तो चेहरा माझी ओढ अजुनच वाढवून गेला
आणि माझ्या मनाचा मोर पिसारा फुलवून तिथेच नाचू लागला.
मनाने पुढाकार घेतला
आणि वाणिने त्यास प्रतिसाद दिला
एकदा सांगितले तिला माझ्या मनातले
आणि केले इतक्या वर्षाचे अस्वस्थ मन मोकळे..
ति हलकेच लाजली आणि तिच्या गालावरील खळी
माझ्या अंतर्मनाने ओळखली
ति म्हणाली किती वेळ लावलास तु…?
कॉलेजमध्ये असताना मला पण आवडत होतास तु…
अरे नशिबा कसला हा खेळ खेळलास
युगान युग दुर ठेवून शेवटी आम्हास मिळवलास
 



तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !


प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं,
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !

काय म्हणता? या ओळी चिल्लर वाटतात?
काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात?
असल्या तर असू दे, फसल्या तर फसू दे !
तरीसुद्धा, तरीसुद्धा
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !

मराठीतून इश्श म्हणून प्रेम करता येतं;
उर्दूमध्ये इष्क म्हणून प्रेम करता येतं;
व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं;
कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरी प्रेम करता येतं !

सोळा वर्षं सरली की अंगात फुलं फुलू लागतात,
जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुलू लागतात !
आठवतं ना, तुमची माझी सोळा जेव्हा सरली होती
होडी सगळी पाण्याने भरली होती !
लाटांवर बेभान होऊन नाचलो होतो,
होडीसकट बुडता बुडता वाचलो होतो !
बुडालो असतो तरीसुद्धा चाललं असतं,
प्रेमानेच अलगद वर काढलं असतं !
तुम्हाला ते कळलं होतं, मलासुद्धा कळलं होतं !
कारण,
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !

प्रेमबीम झूट असतं, म्हणणारी माणसं भेटतात,
प्रेम म्हणजे स्तोम नुसतं, मानणारी माणसं भेटतात !
असाच एक जण चक्क मला म्हणाला,
“आम्ही कधी बायकोला फिरायल नेलं नाही;
पाच मुलं झाली तरी प्रेमबीम कधीसुद्धा केलं नाही !
आमचं काही नडलं का? प्रेमाशिवाय अडलं का?”
त्याला वाटलं मला पटलं !
तेव्हा मी इतकंच म्हटलं,
“प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं मात्र सेम नसतं !”
तिच्यासोबत पावसात कधी भिजला असाल जोडीने,
एक चॉकलेट अर्धं अर्धं खाल्लं असेल गोडीने !
भर दुपारी उन्हात कधी तिच्यासोबत तासन् तास फिरला असाल,
झंकारलेल्या सर्वस्वाने तिच्या कुशीत शिरला असाल !

प्रेम कधी रुसणं असतं,
डोळ्यांनीच हसणं असतं,
प्रेम कधी भांडतंसुद्धा !!
दोन ओळींची चिठीसुद्धा प्रेम असतं,
घट्ट घट्ट मिठीसुद्धा प्रेम असतं !

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं !
 

आठवण.......

आठवण माझी कधीतरी येईलच तुला,
तु कदाचीत रडशीलही,
हात तुझे जुळवुन ठेव तु,
सगळी आसवं तुझी त्यात सामावतील,
जो थांबला तुझ्या हातावर,
नीट बघ त्याच्याकडे,
एकटाच राहीलेला तो थेंब मीच असेल.....

माझ्या आठवणी एखदयाला सांगताना,
तु कदाचीत हसशीलही,
जो थांबेल तुझ्या ओठावर येता-येता,
नीट वापर त्याला,
अडखळलेला तो शब्द मीच असेल.....

कधी जर पाहशील पोर्णीमेच्या तु चंद्राला,
त्याच्या तेजाला तु निखरत राहशील,
मध्येच गर्द काळ्या ढगांनी जर त्याला घेरलं,
नीट बघ त्याच्याकडे घेरलेला तो ढग मीच असेल.....

कधी जर सुटला बेधुंद गार वारा,
मोहक डोळे तुझे मिटुन तु घेशील,
मध्येच स्पर्शली तुला जर उबदार प्रेमळ झुळुक,
नीट बघ जाणवुन ती झुळुकही मीच असेल.

आठवण माझी कधीतरी येईलच तुला,
तु कदाचीत रडशीलही.......






कुठे गेले ते दिवस


कुठे गेले ते दिवस

कुठे गेले ते दिवस ..
जेव्हा मी तुला भेटत होतो ..
तु जरी उशिराने आलीस ..
तरी तुला मात्र समजूण घेत होतो ..
एकदा मला भेटलीस की ..
बोलण तुझ संपत नव्हत ..
रडतानाही हसण तुझ्या ..
गालावर विरघळत होत ..
लाजण तुझ कमी नव्हत ..
पण गालावरच्या खळीमागे ..
ते ही हळूच दडून बसत होत ..
राग तर तुझ्या ..
नाकावरच्या शेङयावर होता ..
कितीही उपाय केले तरीही
तो काही कमी होत नव्हता ..
रागात तर तु फार ..
सुंदर दिसत होतीस ..
म्हणुन तर मला तु ..
तुझ्या रागासकट हवी होतीस..